अरुण देशपांडे आणि Sustainable Development - भाग २
अनिल अवचटांच्या कार्यरत पुस्तकातून अरूण देशपांडेंची ओळख झाली. अरूण देशपांडे स्वतःएक अभियंता आणि हाडाचे संशोधक आहेत. साधारण प्रगती आणि विकासाच्या आपल्या ज्या काही (शहरी) संकल्पना असतात, त्या खरोखरच निरंतर (sustainable) आहेत का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या बाबतीत डोकं शांत ठेवून थोडासा जरी अभ्यास केला, की आपल्या पिढीसमोरील प्रचंड ऊर्जासंकट लगेचच लक्षात येतं. सोलापूरजवळ अंकोली या लहानश्या खेड्यात अरूण देशपांडेंनी शेतीच नव्हे तर एकूणच Sustainable Development या विषयावर केलेलं संशोधन आणि प्रयोग हा आश्चर्यांचा खजिना आहे. वरकरणी अरूण देशपांडे फार टोकाची भूमिका घेताहेत असं वाटतं,पण जेव्हा ते प्रत्येक गोष्टींची गणित मांडून आकडेवारी देतात तेव्हा आपण गप्प होतो.
मी सोलापूरचाच असल्याने या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य मला चांगलंच माहित्येय. त्यामुळेच त्यांनी फुलवलेली शेती ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे.या वर्षी ऑगस्टमधे खरं तर त्यांना भेटण्याची आणि त्यांचा प्रयोग परिवार पाहण्याची फार इच्छा होती, पण त्यावेळी ते स्वत:च भारतात नसल्याने जमलं नाही. पण त्यांचे सहकारी संजय म्हेत्रस यांना सोलापुरात भेटून त्यांच्याशी अगदी मोकळ्या गप्पा मारता आल्या. माझी त्यांच्या कामाशी जशी जशी ओळख होतेय, तसा तसा मी जास्त प्रभावित होतोय.
या गोष्टींचा अभ्यास करताना एक दुहेरी अस्वस्थता मात्र आहे. पहिली म्हणजे, इतकी वर्षं शिकूनही आपले व्यावहारिक ज्ञान शून्य आहे याची जाणीव होतेय. अशा विषयांवर कधीही विचार/चर्चा करण्याची वेळ येवो, आम्ही लोकं फक्त CCD मधे कॉफी पीत अकलेचे तारे तोडत असतो. 'मेधा पाटकर' आणि 'नर्मदा बचाव आंदोलन' वगैरे विषय निघाले, की प्रत्येकाला आपलं मत मांडायची एवढी घाई असते, की विचारू नका. बरं ही मतं मांडण्याआधीचा आमचा अभ्यास काय? तर इकडून तिकडून वाचलेलं काहीतरी अर्धवट आणि पूर्वी ऐकलेल्या असल्याच गप्पा.
अर्धवट शिक्षणातून येणारा हा आडमुठेपणा नकोसा होतोय आता.
दुसरी अस्वस्थता म्हणजे एकूणच संशोधन आणि काम याबद्दल असणार्या आपल्या स्वतःच्याच संकल्पनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. संशोधन, Ph.D. , काम या विषयांबाबत जेव्हा कधी आमच्या गप्पा होतात, तेव्हा भारतात राहायचं असेल तर या गोष्टी बाजूला ठेवा असाच चर्चेचा सूर निघतो. भारतात अडचणी आहेत,हे मी मान्य करतो, पण या अडचणींवर तोडगा काढून कौतुकास्पद काम करणारी लोकंही आहेत. गडचिरोलिचे डॉ. अभय बंग असोत, महाडचे डॉ. बावस्कर किंवा अरूण देशपांडे असोत. (या तिघांचीही ओळख अनिल अवचटांच्या कार्यरत पुस्तकातून होते) या लोकांचं काम पाहिलं की आपण संभ्रमात पडतो. त्यामुळे सगळ्याच संकल्पना तपासून पाहण्याची गरज निर्माण होतेय. हे काम केवळ चांगलं नाहीये तर ते कितीतरी मोठं आणि प्रभावी आहे. शिवाय असं काम करण्यासाठी भारताशिवाय वेगळी जागा आहे का, हा दुसरा मोठा प्रश्न आहे.
असो. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळणार नाहीत. पण त्या दृष्टीने मी वाचन/विचार करतोय यात समाधान आहे.

4 Comments:
hmm..
अरूण देशपांडे आपल्याला आपल्या जीवनशैलीबद्दल मुळापासून विचार करायला लावतात! तरी तुला आणखी त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायचीय :)
मी अरूण देशपांडेबद्दल लिहीण्याचा प्रयत्न केला होता. पण publish करण्याचा धीर नाही झाला. तो draft save करून ठेवला आहे. पुढेमागे जमल्यास publish करेन
धनंजय,
लिहिणं हा खरं तर खूप मोठा motivation चा भाग आहे. त्यामुळे मी उगाचच लिहा म्हणून लोकांच्या गळ्यात पडत नाही.
पण या विषयावर आपण आधीही बरंच बोललो आहोत्,गप्पा मारल्यात त्यामुळे तू लिहिलंस तर ते वाचायला फारच आवडेल. :)
Hi!
Honestly, I did not read this post. But since this is the latest on your blog you might read the comments. :)
Loved your "Matter Mhane" ..do you mind if I put you up on my blogroll? I am assuming it will be a no. :D
And it would not be so much of a disgrace to be on my blog! :P
Kau,
Just would like to point out that on exactly similar lines, the policy of spending "Future Money" is not sustainable, that lead to current recession. I believe, the non-sustainability is a result of a "bad cycle" (Dushtachakra) in which something you achieve fuels back something, that is input to it, via a (long) chain. e.g. pulling out ground water also leads to a similar dushtachakra.
I am sure, I will get my hand on this book soon. Thanks for the article :)
Panther
Post a Comment
Links to this post:
Create a Link
<< Home