संगीताविषयी थोडंसं
संगीता यांच्या ब्लॉगवरील संगीताविषयीचा हा लेख वाचून संगीताबद्दल आपणही थोडं लिहिलं पाहिजे असं वाटून गेलं. :) त्याचा एक प्रयत्न.
१९६० च्या दशकातील उत्तरार्धात इंग्लंड-अमेरिकेत Rock संगीत अगदी नावारूपाला आलं होतं, पण त्यात काही महत्त्वपूर्ण बदल होत होते. याच काळात Psychedelic Rock, Progressive Rock असे नवीन प्रकार उदयास आले. या काळात फार वेगळ्या प्रकारचं संगीत देऊन पूर्ण पाश्चिमात्य संगीतावर खूप प्रभाव पाडणाऱ्या Music Bands मधे इंग्लंड मधील Pink Floyd, Jethro Tull, Led Zeppelin तर अमेरिकेतील The Doors यांची नावं घेता येतील. या लोकांनी दिलेल्या संगीताचा मी प्रचंड फॅन आहे. Rock संगीतात पुढेही खूप बदल होत गेले. अलिकडच्या काळातील Hard Rock, Alternative Rock किंवा Heavy Metal, Death Metal हे प्रकार मला फारसे आवडत नाहीत. Rock संगीताची ओळख म्हणून बहुतेक वेळा नवशिके हे नवीन Rock संगीत ऐकतात आणि एकूणच Rock संगीताच्या बाबतीत त्यांच्या मनात एक पूर्ण चुकीची संकल्पना तयार होते. चांगलं काय आहे , काय ऐकलं पाहिजे हे सांगणारं कोणीतरी भेटणं फार गरजेचं असतं. असो.
Pink Floyd, Jethro Tull यांच्या संगीताने मला अक्षरश: वेड लावलंय. या Bandsची Compositions अत्यंत अवघड पण खूप प्रभावी आहेत. या संगीताची ओळख होण्यापूर्वी इतकं चांगलं आणि सरस Instrumental Music मी पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं.
केवळ या Instrumental Music मुळे मला संगीताचा हा प्रकार इतका जवळचा वाटतो का? नाही. संगीतातील सहजपणा म्हणजे काय किंवा मला जे अपेक्षित आहे त्याबद्दल थोडसं बोलतो . खूप आनंदाच्या क्षणी, कधीतरी कंटाळलेल्या अवस्थेत, निराश असताना किंवा चिडलेल्या क्षणी जे संगीत तुमच्या भावना, मनातला गोंधळ किंवा विचार अचूकपणे reflect करू शकतं ते सहज.
Pink Floyd ग्रुप मधीलच अत्यंत जवळचा मित्र Syd Barrett ड्रग्जच्या आहारी जाऊन स्वत:च्या मनावरचं संतुलन हरवून बसला त्यावेळी इतर मित्रांनी त्याच्यासाठी लिहिलेलं 'Shine on you crazy diamond' किंवा स्वत:चा मुलगा गेल्यावर Eric Clapton ने लिहिलेलं 'Tears in Heaven' ऐकताना सुन्न व्हायला होतं. Jethro Tull चा Ian Anderson घरदार नसलेल्या रस्त्यावर भटकणाऱ्या माणसाबद्दल 'Aqualung' सारख्या गाण्यातून आपुलकीने बोलतो तेव्हा, जेरुसलेम पुन्हा एकदा शांत व्हावं असं Don Mclean कळकळीने सांगतो तेव्हा ही लोकं कुठेतरी आपल्या मनातलंच बोलताहेत असं वाटत राहतं. अभ्यास करताना अत्यंत कंटाळा येतो तेव्हा, सगळं शिक्षण खोटंय असं वाटत असताना Floyd चं "We don't need no education...All in all you are just another brick in the wall" ऐकणं अपरिहार्य होऊन बसतं. इथे IIT मधे संध्याकाळच्या वेळी होस्टेल्स मधे एकत्र येऊन, आपापल्या Guitars, Synth घेऊन संगीतातील नवशिके गाणी म्हणतात तेव्हा Dire Straits च्या 'Sultans of Swing' ची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. कोकेनला मी हात लावलेला नाही, पण त्याची धुंदी मी Clapton च्या 'Cocain' सारख्या गाण्यातून अनुभवतो. मागे 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातील 'मन ये बावरा' हे गाणं आणि त्यावेळच्या माझ्या मन:स्थितीबद्दल मी लिहिलं होतं. आयुष्यात येणाऱ्या रोजच्या अनुभवांना मी कुठेतरी या संगीताशी Relate करत आलोय. बैठक मारून काहीतरी चांगलं ऐकू असं ठरवून ऐकलेलं संगीत वेगळं आणि ते असं सहज ऐकावसं वाटणारं वेगळं. संगीतातील जो सहजपणा मला अपेक्षित आहे तो हा. आणखीन एक गोष्ट. केवळ हलक्याफुलक्या चाली किंवा सोपे शब्द जोडून बनवलेलं संगीत हे श्रवणीय असेल पण सहज वाटेलंच असं नाही.
जुनी हिंदी गाणी मला आवडतात. पण वर्षानुवर्षं आपल्याकडचं चित्रपटसंगीत हे 'प्रेम' या एकाच भावनेत अडकत आलंय याचं मला वाईट वाटतं. अपवाद असतील, पण ते अपवाद आहेत हे महत्त्वाचं. Indian Ocean सारख्या संपूर्णपणे वेगळं संगीत देणाऱ्या Bandचं मला कौतुक वाटतं ते यामुळेच.
शास्त्रीय संगीताच्या बाबतीत माझ्या मनात कोणतीही अढी नाही. बाबांना शास्त्रीय संगीताचं खूप वेड आहे. लहानपणापासून माझ्या कानावर शास्त्रीय संगीत पडत आलंय. सवाईगंधर्व सारख्या कार्यक्रमांनाही मी जातो. पण संगीतातील जो सहजपणा मला अपेक्षित आहे, तो शास्त्रीय संगीतात आहे का, याबद्दल मी आजही साशंक आहे.
संगीता म्हणतात, तसं कोणताही पूर्वग्रह न ठेवता इतर गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. अगदी मान्य. मीदेखील नवीन गोष्टी शिकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतोच आहे. संगीताच्या बाबतीतील माझी मतं ठाम आणि न बदलणारी आहेत असला माझा अट्टाहासही नाही. काळानुरूप आपल्या आवडी-निवडी बदलत जातात. काही गोष्टी जास्त जवळच्या वाटू लागतात. त्यामुळे इथून पुढे काय आवडेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. पण आज मला जे संगीत सर्वात जवळचं वाटतं आणि जे तितकसं जवळचं वाटत नाही याबद्दलची माझी मतं स्पष्ट आहेत. ही गोष्ट मी नाकारू शकत नाही.

12 Comments:
कौस्तुभ,
छानच लिहिलंयस.
माझा नवरा ७०-८० वर फिदा असल्याने घरात सतत ते सुरू असतं. (आणि त्याविषयावर माझं बौद्धिक घेणे हा ही त्याचा आवडता छंद आहे.)
"खूप आनंदाच्या क्षणी, कधीतरी कंटाळलेल्या अवस्थेत, निराश असताना किंवा चिडलेल्या क्षणी जे संगीत तुमच्या भावना, मनातला गोंधळ किंवा विचार अचूकपणे reflect करू शकतं ते सहज."
हे बरोबर आहे. माझ्या एका मैत्रिणीवर घटस्फोटाची पाळी आली. त्या कठीण प्रसंगातून जाताना ग्लोरिया गेनरच्या I will survive ने तिला खूप मानसिक बळ दिले.
भारतिय काव्य अशा वेगवेगळ्या विषयांवर लिहिलं जात नाही हे तुझं म्हणणं मला पटतं.
शास्त्रिय संगीतातल्या चीजांमधे खरं तर निसर्ग, सासू-सुना,नणंद भावजय,सवती मत्सर,गुणीजनांची लक्षणे,भक्तिपर असे अनेक विषय आढळतात. (भारतिय पॉप्युलर संगीतात तितकेही आढळत नाहीत.)तरीही नविन समकालीन चीजा करण्याची गरज आहे, इतकंच नव्हे तर इंग्रजी भाषेतही चीजा तयार करण्याची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.
मी स्वतःला बराच काळ शास्त्रिय संगीताच्या चौकटीत कोंडून ठेवलं होते. पण गेल्या काही वर्षांपासून इतर संगीताची ओळख होते आहे.
नवर्याच्या म्हणण्याप्रमाणे Music that is easy to appriciate will always remain popular. Classical music will always be for classess, not masses.
७०-८० मधल्या सामाजिक जाणिवाही महत्वाच्या आहेत. जॉन लिननच्या Give peace a chance मधे जसे त्याकाळाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब उमटले तसे हल्ली फारसे दिसत.
भारतिय पॉप्युलर म्युझिक हे अनेक वर्ष चित्रपटात अडकून बसले होते. पण आता ती परिस्थिती बदलते आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षात विविध विषयांवर काव्य लिहिले जाईल अशी आशा करू या.
हे सगळं झालं तरी संगीतामधे शब्दांच्या पलिकडे जाण्याचं,भाषा,प्रांत,देश,धर्माच्या सीमा ओलांडण्याचं सामर्थ्य आहे. तिथे मात्रं अभिजातपणाच पाहिजे. अभारतियांना भारतिय गवैय्यांपेक्षा वादक जास्तं भावतात ते ह्या कारणासाठी.
मनातल्या भावना प्रतिबिंबित करणारं गाणं सापडावं हा सहजतेचा एक प्रकार.
आपल्या भावना विसरून गाण्यातल्या भावनांशी नकळत एकरूप होणे हा दुसरा प्रकार.
Music is a wonderful phenomenon and it becomes more powerful if it can resonate your feelings. For me music is a stress buster. It really provides the peace of mind needed in the superfast life.
Nice post! Keep ROCKING :)
संगीता,
इतक्या सविस्तर आणि सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.
७०-८० मधे पाश्चात्त्य संगीतात खूप वेगळ्या आणि चांगल्या विषयांवर लिहिलं गेलंय. सध्याचं इंग्रजी संगीत मी फारसं ऐकत नाही, पण तुम्ही म्हणता ते खरं असावं. इंग्रजी भाषेतही नवीन काव्य लिहिण्याची गरज आहे.
हिंदी संगीतात परिस्थिती बदलते आहे हे मान्य. पण अजूनही लोक जुन्याच संगीतात रमतात. काहीतरी वेगळं Try करणं त्यांना शक्यतो नको असतं. अशी अनेक उदाहरणं मी पाहिली आहेत. त्यामुळे कधीकधी वैताग येतो. असो.
"मनातल्या भावना प्रतिबिंबित करणारं गाणं सापडावं हा सहजतेचा एक प्रकार.
आपल्या भावना विसरून गाण्यातल्या भावनांशी नकळत एकरूप होणे हा दुसरा प्रकार."
- अगदी मान्य. दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. वैयक्तिक आवडीनुसार एखाद्याला एखादी गोष्ट जास्त जवळची वाटते इतकंच.
आनंद,
प्रतिक्रियबद्दल मनापासून धन्यवाद.
sahi ahe re... mala nirvana hi khoop avadataat... tyancha All Appologies tar favourite ahe.
पण वर्षानुवर्षं आपल्याकडचं लोकसंगीत हे 'प्रेम' या एकाच भावनेत अडकत आलंय याचं मला वाईट वाटतं. अपवाद असतील, पण ते अपवाद आहेत हे महत्त्वाचं.
lokasangeet peksha chitrapaTa sangeet mhaN. vividha bharativar dupari lagaNarya lokasangeetachya karyakramaat khoop vegaLi gaaNi asataat.
tari paN aata hindi picchar madhye thode thode vegaLe prayog hot aahetach... pan love songs cha pravaaha khoop joradaar aahe. tyaat bakichi gaani lakshaat yet nahit.
kaahi varshapurvi alelya dil pe mat le yaar madhala swagatam he gana... rabbi cha bulla ki jaana he gana ashi kaahi vegali gaani aataa tujha post vachoon athavataayala lagali.
योगेश,
मला चित्रपट संगीतच म्हणायचं होतं. चूक दुरूस्त केली आहे.
Nirvana चांगलं आहे. म्हणजे Compositions किंवा Guitaring फार great आहे असं मला नाही वाटत, पण काही गाण्यांचे Lyrics चांगले आहेत. MTV-Unplugged अल्ब्ममधली बरीचशी गाणी छान आहेत.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Kaustubh,
I am glad you brought up Ravi Shankar's contribution in making Indian music popular in the Western world. Beatles and Ravi Shankar are key players to make east meet west for the first time.
Also, check this out from Yehudi Menuhin's book "Unfinished Journey"
http://www.rit.edu/~pnveme/raga/Menuin1.html
Hmm, lekh awadala. Kahi diwas mee pan indian classical cha kattar fan hoto. Pan jasajasa aikat gelo tasa kalat gela ki sangeetachi vaishwik bhasha ekach. Mee rock farse aikle nahi. Shastriya bharpur aikto (vocal mostly). Mala watate gane ha apaplya awadicha vishay ahe.
Kahi lok swatahla classical aikta yete/ samajate mhanun hushar samajtat te mala gair watate. Atta atta western classical (mozart, bach wagaire)aikalaya suruwat keli ahe. Tehi awadale.
Rock baddal tuzya kadun funde ghyala aawdel.
Dhananjay
Minglish baddal sorry. But its more convinient and time saving to write in minglish.
Ajun ek, Achyut Godbolencha lekh aala hota tyanchya 'Naadvedh' series madhe. Bharatiya and western sangitatil pharak samajun denara. Mala khoop awadala. Link pathven
shastreeya sangitat je kahi moods uttam prakare reflect hotat ( e.g. bhakti, akrastaLepanawirahit wyakta kelela dukhkha, premabhangatala wiraha ) he moods apalya pidhila tyach frequency ne experience hot nahit. shastreeya sangit sadhana mhanje eeshwarachi sadhana mantat ajahi. aplali idhi tya level war ( mag tee level khalchi aso ki warchi .. waad to nahiye .. different level nakkich ahe ) wichar karat nahi.
similarly apali pidhi je experience karte te : premabhangatali chichid, social/educational athawa itar frustration, romance, ecstacy (cocain) te shastriya sangitachya nirmatyanni tyach frequencywar experience kela nahi. tyamuLe mismatch jaNawato. Shastreeya sangitachi prachinata baghata he mismatch apekshitach ahe. Kahi kaL natakat kam kela asalyamuLe sangu ichchito ki ajahi aaart dukhkha wyakta karayala alapeeshiway dusre changle sadhan anhi aNi tyach weLi anek "modern" moods kewaL rock geetanmadhech sapadtat thumari tithapryanta pohochat nahi. me yaa sangitatali generation gap mhanto. itar sarva kshetranpramaNech sangeethi tyala apawad nahi. apala atta kay mood ahe he oLakhoon kuthala gaNa aikayala hawa he jo jaNato aNi tyapramaNe gaNee aikato to sukhi ...
barech diwas jhale.. kaay pariksha vagaire suru ahe ka?
चांगलं लिहितोस .. का थांबलास?
सुंदर लेख. थोडा उशिरा वाचला त्यामुळे प्रतिक्रियाही उशिरा. मराठी अनुदिनीवर रॉक हा शब्दही सापडत नाही, मग रॉक संगीतावर पोस्ट म्हणजे धमालच! मला स्वतःला पिंक फ्लॉइड तितका अपील झाला नाही. मी क्लॅप्टन, नॉफलर, संताना, मॉरिसन यांचा भक्त आहे.
हिंदी चित्रपट संगीताबद्दल सहमत आहे. ही परिस्थिती बदलेल अशी आशा करू यात.
Post a Comment
Links to this post:
Create a Link
<< Home